Exclusive:..बारावीच्या परीक्षेला आले 74 वर्षांचे आजोबा!

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Feb 18, 2020, 7:19 PM IST

कोल्हापूर - शिक्षणाला वयाची अट नसते याची प्रचिती मंगळवारी कोल्हापूरात आली. संपूर्ण राज्यात बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे. कोल्हापूमधील एका परीक्षा केंद्रावर 74 वर्षांच्या आजोबांनी इंग्रजीचा पेपर लिहिला. रविंद्र बापू देशिंगे असे या आजोबांचे नाव आहे. मुलांच्या गर्दीतून 74 वर्षांचे आजोबा जेव्हा गोखले महाविद्यालयामध्ये बोर्डवर बैठक क्रमांक शोधत होते, तेव्हा सर्वांना वाटले ते त्यांच्या नातवाचा बैठक क्रमांक शोधत आहेत. पण जेव्हा समजले की, ते स्वतःचाचं क्रमांक शोधत आहेत तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या. या संदर्भात त्यांच्याशी संवाद साधला आहे ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी...

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.