पोलिंग पार्टी मतदान केंद्रावर रवाना; 925 ग्रामपंचायतींसाठी 14 लाख मतदार बजावणार मतदानाचा हक्क - यवतमाळ ग्रामपंचायत निवडणूक मतदार
🎬 Watch Now: Feature Video
यवतमाळ - जिल्ह्यातील 980 ग्रामपंचायतींसाठी उद्या (शुक्रवार) मतदान पार पडणार आहे. यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तहसील कार्यालयातून पोलिंग पार्टी ईव्हीएम मशीन व बॅलेट मशीन घेऊन रवाना करण्यात येत आहेत. उद्या सकाळी साडेसात वाजल्यापासून जिल्ह्यातील 2 हजार 832 मतदान केंद्रावर प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होणार आहे. 14 लाख 18 हजार 358 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. 980 ग्रामपंचायती पैकी 55 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने प्रत्यक्ष 925 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होत आहे. सहा हजार 682 जागांसाठी 18 हजार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. निवडणूक प्रक्रियेत पंधरा हजार कर्मचारी सहभागी असून प्रत्येक मतदान केंद्रावर एक प्रिसायडिंग ऑफिसरसह तीन सहकारी कर्मचारी व 3 पोलीस कर्मचारी असणार आहेत.