Video : Ganesh Jayanti - गणेश जयंती निमित्ताने टेकडी गणेश मंदिरात 1100 किलोच्या लाडुचा नैवेद्य - टेकडी गणेश मंदिर 1100 किलो लाडु
🎬 Watch Now: Feature Video
नागपूर - गणेश जयंती निमित्त आज नागपूरच्या प्रसिद्ध टेकडी गणेश मंदिरात बाप्पा करिता 1100 किलो वजनाच्या लाडूचा नैवेद्य तयार करण्यात आला होता. नागपुरातील श्री अष्टविनायक गणेश मित्र मंडळाकडून या विशालकाय लाडूची निर्मिती करण्यात आली आहे. गेल्या 5 वर्षांपासून या मंडळाचे कार्यकर्ते प्रत्येक गणेश जयंतीला 1100 किलोचा लाडू तयार करून बाप्पाला नैवेद्य दाखवतात. त्यानंतर 1100 किलो लाडूचे भक्तांमध्ये प्रसादाच्या स्वरूपात वितरण करण्यात आले. 45 किलो मेवा, बेसन आणि साखरेपासून हा लाडू तयार करण्यात आला असून लाडू तयार करण्यासाठी दोन दिवसांचा कालावधी लागला असल्याची माहिती श्री अष्टविनायक गणेश मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दिली.