राजकारणात उतरणार का? पाहा यावर काय म्हणाली कंगना..!! - कंगना रणौतचे राजकारणावर भाष्य
🎬 Watch Now: Feature Video
'थलायवी' चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चला पोहोचलेल्या कंगना रणौतला ती राजकाणात प्रवेश करणार का असा प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा ती म्हणाली, ''राजकारण हा शब्द माझ्यासाठी अनोळखी आहे. मी जेव्हा आज देशाबद्दल, राष्ट्रवादाबद्दल, शेतकऱ्यांबद्दल जेव्हा मी भाष्य करते तेव्हा मला म्हटले जाते की मी राजकारणाबद्दल बोलत आहे. असं काही नाहीय. मी एक नागरिक म्हणून प्रत्येक गोष्टीबद्दल प्रतिक्रिया देत असते. माझा राजकारणाशी संबंध नसतानाही मी राष्ट्रवादाबद्दल किंवा शेतकरी कायद्यांबद्दल बोलते तेव्हा काही लोकांना त्याचा त्रास होतो.''