अभिनेता संदीप नाहरचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत सापडला - मुंबई पोलिस - पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर
🎬 Watch Now: Feature Video
अभिनेता संदीप नाहरने मुंबईतील गोरेगाव भागात आत्महत्या केल्यामुळे मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी सोमवारी दिली. पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, नाहरचा त्याच्या निवासस्थानी मृत्यू झाला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. संदीपचा मृतदेह त्याच्या बेडरूममध्ये मिळाला. पंचनामाकरून पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. त्याचा अहवाल आल्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल आणि संदीपचा मृत्यू कशामुळे झाला हे स्पष्ट होईल, अशी माहिती पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर यांनी दिली.