सुजय डहाके याच्या 'त्या' वक्तव्यावर प्रार्थना बेहेरेने दिलं 'हे' उत्तर... - Prarthan Beharelatest news
🎬 Watch Now: Feature Video
कोल्हापूर - सर्वच मराठी मालिकांमध्ये ब्राह्मण अभिनेत्रीचं मुख्य भूमिकेत का आहेत, असा सवाल मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक सुजय डहाकेने केल्यानंतर एका नव्या चर्चेला सुरूवात झाली होती. सुजय डहाकेने दिलेल्या एका मुलाखतीत हा प्रश्न विचारत मराठी चित्रपटसृष्टीत जातीय भेदभाव असल्याचे म्हटले होते. त्याच्या या वक्तव्यानंतर अनेक प्रतिक्रिया उमटत असतानाच अभिनेत्री प्रार्थना बेहेरेने सुद्धा आता त्याला उत्तर दिले आहे.
''मी प्रार्थना बेहेरे असली तरी माझा गुजरातमधल्या वडोदरामध्ये जन्म झाला आहे. त्यामुळे पहिला प्रश्न मी गुजराती आहे की मराठी हा येतो. ज्या वेळी साधं मराठीही बोलता येत नव्हतं त्या वेळी मला या मराठी चित्रपटसृष्टीने स्वीकारलं होतं. त्यानंतर मी स्वतः चांगल्या प्रकारे मराठी शिकले. एक गुजराती मुलगी मराठी होते. त्यामुळे ही ब्राम्हण आहे आणि ही ब्राह्मण नाही हे वादच मुळात चुकीचं'', असल्याचे प्रर्थना म्हणाली. येत्या 20 मार्च ला प्रार्थना बेहेरेचा 'अजिंक्य' हा आगामी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. यापार्श्वभूमीवर चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कोल्हापूरात आल्यानंतर 'ईटीव्ही भारत' सोबत संवाद साधत असताना तिने आपली प्रतिक्रिया व्यक्त केलीये.