Bday Spl: रील लाईफप्रमाणेच रंजक आहे ओम पुरींचं खरं आयुष्य, पाहा व्हिडिओ - om puri career
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - हिंदी सिनेसृष्टीवर आपल्या अभिनयाच्या जोरावर वेगळी ओळख निर्माण करणारे अभिनेते म्हणजे ओम पुरी. त्यांचा आज जन्मदिवस आहे. १९५० साली त्यांचा जन्म अंबाला येथे पंजाबी कुटुंबात झाला होता. 'आक्रोश' आणि 'अर्ध सत्य' यांसारख्या चित्रपटातून त्यांच्या दमदार अभिनयाची झलक सर्वांनी पाहिली होती. त्यांच्या व्यावसायिक आयुष्यासोबतच त्यांचं वैयक्तिक आयुष्यही अधिक चर्चेत राहिलं. त्यांच्या जन्मदिनानिमित्त जाणून घेऊयात हे काही खास किस्से.....