ऋषी कपूर यांचे निधन वेदनादायी; अश्विनी भावेंनी दिला आठवणींना उजाळा.. - अश्विनी भावे ऋषी कपूर आठवणी
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर यांचे आज निधन झाले. ऋषी कपूर यांच्या निधनाबाबत अभिनेत्री अश्विनी भावे यांनी दुः ख व्यक्त केले आहे. हीना चित्रपटाच्या वेळी ऋषी कपूर यांच्याकडून मिळालेला स्नेह आणि मार्गदर्शन यांमुळेच माझा आत्मविश्वास उंचावला. याबद्दल मी त्यांची कायम आभारी असेल. त्यांच्यासह काम करण्यापूर्वीपासूनच मी त्यांची चाहती होते. या दुः खातून बाहेर पडण्याचे सामर्थ्य कपूर कुटुंबीयांना मिळो, ही प्रार्थना मी करते, अशा शब्दांमध्ये अश्विनी भावे यांनी आपल्या आठवणींना उजाळा दिला..