VIDEO : पुण्यातील लाल महाल येथे शिवजन्मोत्सव साजरा - शिवजयंती लालमहाल

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Feb 19, 2022, 5:33 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST

पुणे - आज छत्रपती शिवाजी महाराजांची 393 जयंती आहे. ( 393rd Shiv Jayanti Pune ) यानिमित्ताने पुणे शहरामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम राबवले जातात. यातील प्रमुख आकर्षण असलेले लाल महालातील शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या दिमाखदारपणे पार पडला. ( Shivjayanti Celebration Lal Mahal Pune ) यावेळी शिवजन्मोत्सव समितीचे आद्य प्रवर्तक अमित गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा संपन्न झाला. सदर सोहळ्याला मराठा समाजा सोबतच रामोशी, कोळी अशा विविध घटकांनी सहभाग नोंदवला होता. हा सोहळा म्हणजे राष्ट्रीय एकात्मतेचा सोहळा असल्याचे यावेळी गायकवाड यांनी सांगितले. या सोहळ्याला विविध मर्दानी खेळ, पोवाडे आदी सादर झाले. लाल महालापासून ते शिवाजी मिलिटरी स्कूलपर्यंत जिजाऊ ज्योत महिलांच्या हस्ते नेऊन सोहळा संपन्न झाला. यावेळी जॉइंट कमिशनर ऑफ पोलीस रवींद्र शिसवे उपस्थिती होते. सदर सोहळ्याला लहान मुले, स्त्रिया, तरुण तरुणी पारंपारिक वेशभूषा मध्ये होते. तर शिवछत्रपतींच्या वेशातील लहान मुले सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.
Last Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.