Shivesena Workers Reactions : झुकेंगे नही, आम्ही सर्व शिवसैनिक संजय राऊत यांच्या मागे - Shivesena Workers Reactions
🎬 Watch Now: Feature Video
पुणे - शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद ( Sanjay Raut Press Conference ) घेत भाजप नेत्यांवर व केंद्रीय तपाय यंत्रणेवर गंभीर आरोप केले. हा ट्रेलर असून येणाऱ्या काळात व्हिडिओ आणि पुराव्यांसह पुढे येणार असल्याचेही ते म्हणाले. संजय राऊत यांनी आज जे काही मांडले ते सत्य असून या राज्यातील शिवसैनिक हा राऊत यांच्याबरोबर आहे, अशी प्रतिक्रिया पुण्यातील शिवसैनिकांनी दिली आहे. ते म्हणाले, केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून दबाव आणून राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा प्रयत्न होत असेल. मात्र, संघर्षातूनच शिवसेना निर्माण झाली आहे, त्यामुळे शिवसेनेला संघर्ष नवा नाही. बाळासाहेब ठाकरे म्हणत होते, मोडेल पण वाकणार नाही. यामुळे शिवसैनिक झुकेंगे नही, असे म्हणत पुण्यातील शिवसैनिकांनी संजय राऊत यांच्या मागे असल्याची प्रतिक्रिया दिली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:12 PM IST