Raut On Fadnavis : त्यांचा जीव तीळ-तीळ तुटला असेल! राऊतांची फडणवीसांवर टीका - संजय राऊत यांची किरीट सोमैया यांच्यावर टीका
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - बाजारात लिलाव करून मातृभूमीचा लिलाव करणारे भाजपचे महात्मा किरीट सोमैया, त्यांचे महापुत्र नील सोमैया यांचे मी देशद्रोहाचे घटाळे बाहेर काढले आहेत. (Sanjay Raut on Fadnavis) परंतु, मला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल आश्चर्य वाटते. राष्ट्रभक्तीची गाणी म्हणतात, दुसऱ्यांना राष्ट्रभक्ती शिकवतात. मात्र, काल फडणवीस यांनी सोमैया यांच्यासारख्या देशद्रोही माणसाची बाजू घेतली. हे पाहून स्वर्गात, गोळवकर गुरूजी, बाळासाहेब देवरस, डॉक्टर हेडगेवार, आणि आजचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचा जीव तीळ-तीळ-तीळ तुटला असेल, अशी प्रतिक्रिया देत, सोमैयांची पाठराखन केल्याने शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST