fire in Bhiwandi : भिवंडीत पुन्हा भंगारच्या गोदामाला आग; एकजण गंभीर जखमी
🎬 Watch Now: Feature Video
ठाणे - भिवंडीत पुन्हा आग लागल्याची घटना घडली आहे. शहरातील धामणकर नाका फैजान कंपाऊंड येथील एका भंगार साठवलेल्या गोदमाला आग लागली. (fire in Bhiwandi) या आगीत एक कामगार होरपळून गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर मुंबईतील नायर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अताउल्ला खान (वय 18 वर्ष) असे गंभीर भाजलेल्या कामगारचे नाव आहे. या आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान, परिसरातील विजपुरवठा खंडीत करण्यात आला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:11 PM IST