ED Sealed Sanjay Raut House : संजय राऊत यांचे दादरमधील घर ईडीकडून सील; घरासमोरून प्रतिनिधीने घेतलेला आढावा
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - ED कडून शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांची तब्बल अकरा कोटींची संपत्ती जप्त ( Sanjay Rauts house in Dadar sealed by ED ) करण्यात आली आहे. यात त्यांच्या अलीबाग किहिम येथील संपत्तीसह मुंबईतील दादर परिसरातल्या गार्डन कोर्ट टॉवरमधील फ्लॅटचा देखील समावेश ( Sanjay Raut Property Seize By ED ) आहे. मुंबईतील बहुचर्चित पत्रा चाळ घोटाळ्यात ( Patra Chaal scam case ED action ) राऊत यांचे सुरुवातीला नाव आले होते. 1034 कोटींच्या हा घोटाळा झाला होता. याप्रकरणी तपास यंत्रणांकडून प्रवीण राऊत यांना ताब्यात घेण्यात आले होते. प्रवीण राऊत यांच्या प्राथमिक चौकशी संजय राऊत यांचं नाव समोर आले. यामध्ये 55 लाख बिनव्याजी रक्कम राऊत त्यांच्या खात्यावर जमा केल्याचं तपासणं यंत्रणांच्या निदर्शनास आले. यातून राऊत यांनी त्यांचा मित्र सुजित पाटकर यांच्या साह्याने अलिबागच्या किहीम येथे आठ प्लॉट खरेदी केले. सोबतच दादरच्या 'गार्डन कोर्ट' टॉवरमध्ये 25 व्या माळ्यावर एक फ्लॅट देखील खरेदी करण्यात आला. ही सर्व संपत्ती राऊत यांनी त्यांची पत्नी वर्षा राऊत यांच्या नावावर खरेदी केली. तर, सुजित पाटकर यांनी त्यांची पहिली पत्नी स्वप्ना पाटकर यांच्या नावावर खरेदी केली आहे. मात्र, आता ही सर्व संपत्ती तपास यंत्रणांकडून जप्त करण्यात आली आहे. ( ED Sealed Sanjay Raut House )
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST