सोलापुरात 392 किलो पेढे वाटप करून शिवजयंती साजरी; संभाजी आरमारचा उपक्रम - शिवाजी महाराज जयंती साजरी संभाजी आरमार
🎬 Watch Now: Feature Video
सोलापूर - शिवाजी महाराज यांची 392 वी जयंती सोलापुरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली. संभाजी आरमारच्या ( Sambhaji Aarmar Celebrate Shiva Jayanti in Solapur ) वतीने सोलापुरातील रंगभवन चौक येथे 392 किलो पेढे वाटप करून शिवजयंती साजरा करण्यात आली. यावेळी सोलापूरचे पोलीस उपायुक्त बापू बांगर, सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती. संभाजी आरमारकडून दरवर्षी शिवजयंती साजरी केली जाते. पण, गेल्या दोन वर्षांपासून सार्वजनिक उत्सवांवर निर्बंध आले होते. पण, या वर्षी निर्बंधात शिथिलता आल्याने वेगवेगळ्या शिवमंडळांनी सोलापुरात शिवजयंती साजरी केली. संभाजी आरमारच्या वतीने गोरगरीब नागरिकांना 392 किलो पेढे वाटप करण्यात आले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST