Viral Video : पोलीसाने भागवली माकडाची तहान - viral video
🎬 Watch Now: Feature Video
ठाणे : वर्दीतला पोलीस जेवढा कायद्याने वागतो, तेवढाच समाजात बदनाम असल्याचे अनेक किस्से आपण नेहमीच पाहिले किंवा ऐकले असतील. मात्र याच पोलीस वर्दीतल्या एका वाहतूक पोलिसाने रख रखत्या उन्हात पाणी शोधत व्याकुळ झालेल्या माकडाची तहान भागवत माणुसकीचे दर्शन दिल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर भलताच व्हायरल झाला आहे. संजय घुडे असे माकडाची तहान भागविणाऱ्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून ते मुरबाडमधील सरळगावचे रहिवासी आहेत. पोलीस कर्मचारी संजय घुडे ठाणे ग्रामीण महामार्ग वाहतूक विभागात माळशेज घाट येथे अडीज वर्षांपासून कार्यरत आहेत. गुरुवारी दुपारच्या सुमाराला माळशेज घाट मार्गातीलआबेच्या वळण या ठिकाणी एक माकड पाण्याच्या शोधात जंगलातून घाट मार्गावर फिरत होते. त्याचवेळी पोलीस कर्मचारी घुडे यांच्या पाण्याची बाटली पाहून ते माकड व्याकुळ होऊन त्याच्याकडे पाहत होते. त्या माकडाला खूपच तहान लागल्याचे समजताच त्यांनी माकडाला रस्त्यावरच पाण्याने भरलेली बाटली आपल्या हाताने त्याच्या तोंडाला लावून त्याची तहान भागवली. त्यावेळी दुचाकीवरील काही तरुणांनी माकड पाणी पीत असतानाचे मोबाईल कॅमेऱ्यात चित्रीकरण करून तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:21 PM IST