VIDEO : आमलकी एकादशी निमित्त विठुरायाच्या गाभाऱ्याला मोगरा व शेवंती फुलांची आरास - आमलकी एकादशी पंढरपूर मंदिर आरास
🎬 Watch Now: Feature Video
पंढरपूर - श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या वतीने आमलकी एकादशी ( Aamalaki Ekadashi ) निमित्त श्री विठ्ठल व रूक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात तसेच मंदिरात मोगरा व शेवंतीच्या फुलांची सुंदर व मनमोहक आरास करण्यात आली आहे. ( Vitthhal Mandir Decorated with Flowers Pandharpur ) यामुळे विठुरायाची सावळे रूप अधिकच खुलून दिसत होते. प्रत्येक सण आणि उत्सवानिमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या गाभाऱ्यात रंगीबेरंगी फुलांचा वापर करुन सजावट केली जाते. आमलकी एकादशी निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात शेवंती व मोगरा फुलांचा वापर करून विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या गाभारा सुंदर रित्या सजवण्यात आला. आमलकी एकादशी निमित्ताने पंढरपूर भाविकांनी एकच गर्दी केली. यावेळी भाविकांनी विठूरायाचा जयघोष केला. विठ्ठल मंदिर समितीकडून विठुरायाचे मुखदर्शन भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:19 PM IST