Yuva Sangarsh yatra : युवा संघर्ष यात्रेला पुण्यातून सुरवात; रोहित पवारांच्या साथीनं खासदारांसह माजी मंत्रीही यात्रेत सहभागी - walk to solve the problems of the youth

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 24, 2023, 4:59 PM IST

पुणे : युवकांचे विविध प्रश्न हाती घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली आज युवा संघर्ष यात्रेला सुरवात झाली आहे. 25 ऑक्टोबर ते 5 डिसेंबर असा या पदयात्रेचा कालावधी असणार आहे. युवा संघर्ष यात्रेचा शुभारंभ म्हणून आज रोहित पवार यांनी सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केलं. तसंच त्यानंतर महात्मा फुले वाडा, लाल महाल येथे अभिवादन करून या युवा संघर्ष यात्रेला सुरवात झाली. यावेळी लाल महाल ते टिळक स्मारकापर्यंत पायी यात्रा काढण्यात आली. तिथं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे तरुणांना मार्गदर्शन करणार आहे. एकूण 800 हून अधिक किमी प्रवास पदयात्रेच्या माध्यमातून करण्यात येणार असून राज्यातील बेरोजगारीचा वाढलेला दर, परीक्षा आयोजित करण्यात होणारा विलंब, कायमस्वरूपी पदांऐवजी कंत्राटी नोकऱ्यांचा प्रसार आणि आपल्या तरुणांच्या भविष्याला गंभीरपणे धोक्यात आणणारी इतर असंख्य आव्हाने यासारख्या समस्यांबाबत युवा वर्ग व नागरिकांशी भेटून चर्चा केली जाणार आहे व त्यांच्या नेमक्या काय अपेक्षा आणि इच्छा आहेत, त्याबाबत व्यक्त होण्याची संधी त्यांना या यात्रेदरम्यान मिळणार आहे. 

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.