Death of monkey भूतदयेचा प्रत्येय; वाहनाच्या धडकेत मृत पावलेल्या माकडावर तरूणांनी केले अंत्यसंस्कार - Death of monkey

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Nov 6, 2022, 7:36 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST

समाजातून आता माणूसकी संपली आहे, अशी नकारघंटा कायम आपण सतत ऐकत असतो. पण आजही माणुसकी जिवंत असल्याचा प्रत्यय घडलेल्या घटनेने आला. त्यामुळे समाजासमोर आदर्श निर्माण झाला आहे. एका चार चाकी वाहनाच्या धडकेत जागीच मृत्युमुखी Died on spot after being hit by fourwheeler पडलेल्या मृत माकडावर क्षणाचाही विलंब न लावता तेथील उपस्थित तरुणांनी एकत्र येत मानवावर अंत्यसंस्कार करावे. त्याप्रमाणे सर्व सोपस्कार पार पाडलेत. माकडाच्या टोळीतील एका माकडाच्या मागे काही कुत्र्यांनी धाव घेतल्याने ते माकड रोड वरून सैरभैर धावत असतानाच चार चाकी वाहनांच्या धडकेत माकड जागीच ठार झाले. ही घटना वर्दळीच्या जुना बायपास रोडवर एमआयडीसी पोलीस चौकी नजिक घडली. माकडात काही जीव असेल म्हणून काही तरुणांनी माकडाला पाणी पाजण्याचा प्रयत्न केला. परंतु वाहनाची माकडाला जोरदार धडक बसल्याने ते जागीच गतप्राण झाले होते.
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.