Pune Crime : रस्त्याच्या मधोमध कारच्या टपावर बसून तलवारीने कापला केक; पहा व्हिडिओ - Youth Celebrate Birthday In Sahakar Nagar

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jun 22, 2023, 5:17 PM IST

पुणे : शहरात गेल्या काही महिन्यांपासून अल्पवयीन मुलांचे गुन्हेगारीमध्ये प्रमाण वाढले आहे. कोयता गँग असो की, इतर गुन्हे असो यात अल्पवयीन मुलांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर आहे. पुण्यातील सहकारनगर परिसरात टोळक्याने वाहनांची तोडफोड केल्याची घटना नुकतीच घडलेली असताना, आता सहकार नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक घटना घडली आहे. चक्क रस्त्याच्या मध्ये चार चाकी वाहन आडवे लावून, तलवारीने केक कापतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. सहकार नगर परिसराच्या हद्दीत एका टोळक्याने भर चौकात गाडी आडवी लावून त्यावर तलवारीने केक कापला आहे. बुधवारी मध्यरात्री ही घटना घडली आहे. हा केक कापत असताना या टोळक्याने या ठिकाणी धिंगाणा देखील घातला आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिक काही काळ दहशतीच्या छायेत होते. यासंदर्भात सहकार नगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस अधिकारी सावळाराम शाळगावकर यांनी कारवाई केली जाईल सांगितले.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.