Koyta Attack On Girl: विरारमध्ये तरुणीवर कोयत्याने हल्ला; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद - Young girl attacked by Koyta

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jul 16, 2023, 6:14 PM IST

पालघर: विरारमध्ये एका दुकानात काम करणाऱ्या तरुणीवर कोयत्याने हल्ला करण्यात आला आहे. शनिवारी रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली. या हल्ल्यात प्रचिती पाटील ही तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर संजीवनी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
विरार पश्चिमेच्या फलाट क्रमांक एकला लागून सुनील गुप्ता यांचे दुकान आहे. या दुकानात प्रचिती पाटील ही तरुणी काम करते. बुधवारी रात्री आठच्या सुमारास ती दुकानात काम करत असताना एक अनोळखी तरुणी दुकानात आली व काही वेळात तिने आपल्याकडील कोयत्याने प्रचितीवर हल्ला केला. यात ती गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी जवळच्या संजीवनी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हल्लेखोर तरुणीला स्थानिकांच्या मदतीने पकडून विरार पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. विरार पोलिसांनी या हल्लेखोर तरुणीवर गुन्हा दाखल करून अटक केली आहे. हा हल्ला नेमका का केला, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.