वाहतूक कोंडीकडे लक्ष वेधण्यासाठी रेड्यावर यमदूत बसवून अनोखं आंदोलन - Yamdoot Agitation

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 10, 2023, 6:46 PM IST

पुणे Yamdoot Agitation: 'पुणे तिथं काय उणे' ही म्हण नेहमी आपण ऐकतो. याची प्रचिती देखील पुण्यात वेळोवेळी येते. (Katraj Kondhwa Road) पुण्यातील कात्रज-कोंढवा रोड येथील वाहतूक कोंडीचा विषय गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित असून यासाठी विविध आंदोलनं करण्यात येत आहेत. (Traffic Problems) कात्रज-कोंढवा रोड येथील जीवघेणी वाहतूक कोंडी आणि प्रलंबित उड्डाणपुलाच्या प्रश्नावर लक्ष वेधून घेण्यासाठी कात्रज विकास आघाडीनं या रोडवर अनोख्या पद्धतीनं आंदोलन केलं आहे. (Katraj Development Aghadi)
कात्रज विकास आघाडीच्या कात्रज-कोंढवा रस्त्यावर रेड्यावर यमदूतला बसवून त्याला हेल्मेट लावून, हातात फलक घेऊन आंदोलन करत या रस्त्यावरील समस्यांवर लक्ष वेधण्यात आलं आहे. हातात संदेश असलेला बोर्ड घेऊन यमराजाची त्यांचे वाहन असलेल्या खऱ्याखुऱ्या रेड्यावर आलेली स्वारी नक्कीच जीवघेण्या वाहतुकीत धडकी भरवणारी होती.

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.