Women devotees Bath In Ram Teerth : ऋषी पंचमीनिमित्त महिला भाविकांची 'येथे' दरवर्षी होते स्नानासाठी गर्दी, जाणून घ्या कारण

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

नाशिक Women Bath In Ram Teerth: भाद्रपद मासातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला ऋषी पंचमी म्हणतात. या दिवशी महिला व्रत करतात. हे व्रत कळत-नकळतपणे झालेल्या पापांचे दोष दूर करण्यासाठी केले जाते, (Rishi Panchami) अशी आख्यायिका आहे. यावर्षी हे व्रत 20 सप्टेंबरला मंगळवारी आहे. स्त्रियांकडून रजस्वला अवस्थेत घरातील भांडे आणि (Godavari Baths Nashik) इतरही वस्तूंना स्पर्श झाल्याने लागलेले पाप दूर करण्यासाठी हे व्रत केले जाते. या व्रतामध्ये मुख्यतः सप्तऋषी (Rishi Panchami Nashik) आणि अरुंधती यांचे पूजन केले जाते. यामुळे याला ऋषी पंचमी असे म्हणतात. आख्यायिकेनुसार ऋषी पंचमीच्या निमित्ताने हजारो महिलांनी नाशिकच्या रामकुंडावर गोदावरी नदीत स्नान करून पूजन करत सप्तऋषी  श्रद्धा अर्पण केली. (Rishi Panchami 2023)
भाद्रपद मास शुक्ल पक्ष मुहूर्तावर येणाऱ्या पंचमीला ऋषी पंचमीचे हे व्रत करण्यात येते. गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी सप्तऋषींची पूजा केली जाते. हे व्रत जीवनात पाप नाश मुक्तीसाठी करण्यात येते. तसेच हे व्रत केल्यास विवाहित महिलांची मनोकामना पूर्ण होते अशी मान्यता आहे. महिला सप्तऋषींची विधीनुसार पूजा करून सुख, शांती, समृद्धी, धन-धान्य, संतती प्राप्तीची मनोकामना करतात. हळद, चंदन, फुलं, अक्षता यांचा अभिषेक करून क्षमायाचना केली जाते. अविवाहित मुलींसाठीही हे व्रत विशेष फलदायी मानले जाते. तसेच या दिवशी गंगा स्नान करण्याला विशेष महत्त्व आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.