पंढरपुरात पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या महिलेस वाचवण्यात यश - पंढरपुरात पुराच्या पाण्यात महिला वाहाली
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-16104616-thumbnail-3x2-op.jpg)
पंढरपूर भीमा नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. प्रशासनाच्या वतीने woman swept away by flood water in Pandharpur saved नदीकाठच्या लोकांना व नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना वारंवार देत असताना सुद्धा पंढरपूरमध्ये एक महिला पुराच्या पाण्यामध्ये पडल्याची घटना घडली. रविवार 14 ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता पंढरपूर येथील दगडी पुलाजवळील नवीन पुलावरून एक ६५ वर्षीय महिला शेगाव दुमालाच्या बाजूच्या पुलावरून भीमा नदीच्या पात्रामध्ये पडली होती. ही बाब स्थानिक नागरिक व आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या निदर्शनास आली. स्थानिक लोकांनी आरडाओरडा केल्यानंतर प्रशासनाच्या वतीने व नगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन पंढरपूर नगरपरिषद यांच्या अग्निशामन बोट विभागाच्या वतीने तातडीने नदी पात्रात धाव घेत भारती चव्हाण या महिलेला पुराच्या पाण्यातून काढल्यानंतर पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयाकडे रवाना करण्यात आले. या बचाव कार्यामध्ये आपत्ती व्यवस्थापक पथकातील पांडुरंग मवारे, प्रज्वल गणेश तारे, दीपक धोत्रे आदी सहभागी झाले होते. आपत्ती व्यवस्थापनाच्या तात्काळ अंमलबजावणीमुळे एका महिलेचे प्राण वाचल्याने पंढरपूर वासियाकडून आपत्ती व्यवस्थापन पथकाचे कौतुक होत आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:26 PM IST