Buldhana News: 'या' मागणीसाठी महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न, पाहा व्हिडिओ - आझाद हिंद संघटनेच्या वर्षा ताथरकर
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/640-480-17942171-thumbnail-4x3-buldhana.jpg)
बुलढाणा : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेले अवैध धंदे बंद झाले पाहिजेत, या मागणीसाठी जळगाव जामोद येथील महिलेने घेतले अंगावर डिझेल घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला आहे. बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या महिलेने अंगावर डिझेल घेतले. प्राप्त माहितीनुसार बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथील आझाद हिंद संघटनेच्या वर्षा ताथरकर यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक यांना जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करावे, ही मागणी करत अवैध धंदे बंद न झाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. त्याप्रमाणे त्यांनी बुधवारी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर डिझेल घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तो प्रयत्न हाणून पाडला. त्या महिलेला ताब्यात घेतले. अवैध धंदे बंद करण्याची त्यांची मागणी होती.