शंकराचार्यांचा अपमान करणाऱ्या नारायण राणेंवर भाजपा कारवाई करणार का? अतुल लोंढेंचा सवाल - अतुल लोंढेंचा सवाल

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 13, 2024, 10:23 PM IST

मुंबई: अयोध्येत राम मंदिराचा लोकार्पण सोहळा होतोय; मात्र या सोहळ्यावरून देशात राजकारण तापलं आहे. मंदिराचं बांधकाम पूर्ण झालं नसताना भाजपाला आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला प्राणप्रतिष्ठापणा करण्याची घाई झाल्याचा आरोप सुरू आहे. (Narayan Rane) शंकराचार्यांनी अर्धवट मंदिरात प्राणप्रतिष्ठापणा करणं चुकीचं असल्याचं म्हटल्या नंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्यांचं योगदान काय? (Londhe question on BJP) असा सवाल विचारला. यावर राणेंचं योगदाय काय? असा प्रतिप्रश्न काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी मंत्री नारायण राणे यांना केला आहे. (Ram Mandir issue)

राणे हिंदू धर्म भ्रष्ट करीत आहे: अतुल लोंढे पुढे म्हणाले की, नारायण राणे हे राजकीय स्वार्थासाठी शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आणि काँग्रेसमधून भाजपात गेले आहेत. (Shankaracharya) भाजपात आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती करण्याशिवाय गत्यंतर नाही. म्हणूनच मोदींसाठी हिंदू धर्माच्या सर्वोच्च पदावरील शंकराचार्य यांनाच तुमचे योगदान काय? असा सवाल विचारून त्यांनी सर्व मर्यादा पार केलीय. मर्यादा पुरुषोत्तम म्हणून श्रीराम प्रभू यांना म्हटलं जातं. त्यांनी कधीही आयुष्यात मर्यादा ओलांडली नाही. सत्ता मिळत असताना, सत्तेचा त्याग करत 14 वर्ष वनवास स्वीकारला. अशा श्रीराम प्रभू यांच्या मंदिराकरिता शंकराचार्य यांच्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे वक्तव्य करून हिंदू धर्म भ्रष्ट करत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.