Elephants Cross Brahmaputra River : अन्नाच्या शोधात जंगली हत्तींनी पार केली धो-धो वाहणारी ब्रह्मपुत्रा नदी, पहा व्हिडिओ
🎬 Watch Now: Feature Video
माजुली - आसाम राज्य हे त्याच्या समृद्ध जैवविविधतेसाठी ओळखले जाते. साहजिकच येथे हत्ती, एक शिंगी गेंडा तसेच हरीण इत्यादी प्राण्यांचा मनुष्याशी सतत संघर्ष होत असतो. गेल्या काही दिवसांपासून आसामच्या अप्पर माजुलीच्या विविध भागात जंगली हत्तींचा मोठा कळप फिरतो आहे. दिवसा हत्तींचा कळप ब्रह्मपुत्रा नदीच्या आसपास फिरत असतो. तर रात्री तो अन्नाच्या शोधात जंगलात प्रवेश करतो. हत्तींचा कळप प्रामुख्याने पुराच्या हंगामात ब्रह्मपुत्रा नदीतील बेटांवर जातो, जेव्हा ब्रह्मपुत्रा नदीच्या पाण्याची पातळी धोक्याच्या वर असते. ब्रह्मपुत्रा नदी ओलांडताना हत्तींच्या एका कळपाचा असाच एक व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या व्हिडिओने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. पावसाळ्यात काझीरंगा सारखे जंगल पुरात बुडाल्याने हत्तींचा कळप अन्नाच्या शोधात माजुलीला पोहोचतात. पहा हा व्हिडिओ