नारायण राणेंनी पुन्हा एकदा मराठा समाजाला डिवचलं; मनोज जरांगे पाटलांचा एकेरी उल्लेख - मंत्री छगन भुजबळ
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/30-11-2023/640-480-20150635-thumbnail-16x9-narayan-rane-on-manoj-jarange-patil.jpg)
![ETV Bharat Marathi Team](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/authors/maharastra-1716536262.jpeg)
Published : Nov 30, 2023, 4:13 PM IST
पुणे Narayan Rane On Manoj Jarange Patil : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आक्रमाक झाले आहेत. ते राज्यभर दौरा करून काही नेत्यांवर टीकाही करत आहेत. तर दुसरीकडं मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे देखील आक्रमक झाले आहेत. मराठा आणि ओबीसी असा वाद होताना दिसत आहे. अशातच मनोज जरांगे पाटील यांच्याबाबतीत भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी याबाबत आपलं मत व्यक्त केलंय. ते म्हणाले की, कोण मनोज जरांगे पाटील? याला मी ओळखत नाही. कशाला त्याचं नाव घेता. त्याचा मराठा आरक्षणावर काय अभ्यास आहे? मराठा आरक्षण घटनेच्या कोणत्या कलमानं देण्यात येणार हे त्यानं सांगावं. मनोज जरांगे पाटील यांचा एकेरी उल्लेख करत नारायण राणे यांनी पुन्हा एकदा मराठा समाजाला डिवचलंय.