Whale Fish खोल समुद्रात बोटीसमोर आला व्हेल मासा, पहा व्हिडिओ - Whale Fish
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-16923700-thumbnail-3x2-fish.jpg)
विरार येथील अर्नाळ्याच्या खोल समुद्रात मासेमारीसाठी Deep sea fishing गेलेल्या बोटी समोर अचानक भलामोठा देवमासा Whale Fish आला होता. त्याला मच्छिमारांनी खायायला खाद्य टाकले Fishermen threw food to eat व त्यानंतर तो निघून गेला. यावेळची दृश्य मच्छिमारांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात टिपली आहेत. अर्नाळ्यातील मच्छिमार प्रमोद खारखंड हे नेहमीप्रमाणे आपली प्रकाश नावाची मासेमारी बोट घेऊन खोल समुद्रात मासेमारी साठी गेले होते. यावेळी अचानक त्यांच्या बोटी समोर देव मासा आला. हा मासा कदाचित भुकेला असल्याने मच्छिमारांनी बोटी मध्ये पकडलेले बोंबील, मांदेली व कोळंबी असे दोन कॅरेट मासे या मास्यासमोर टाकले हे खाद्य खाल्ल्यानंतर हा मासा तिथून निघून गेला. ही सर्व दृश्य मोबाईल कॅमेऱ्यात चित्रित करण्यात आली आहेत. या आधी देखील भाईंदर उत्तन मधिल एका बोटीच्या जाळयात देव मासा अडकला होता,त्याला मच्छिमारांनी जाळे कापून जीवदान दिले होते.
Last Updated : Feb 3, 2023, 8:32 PM IST