pipeline burst पाण्याची पाईपलाईन फुटून; लाखो लिटर पाण्याची नासाडी - water was wasted
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-16389048-thumbnail-3x2-pune.jpg)
राज्यात अनेक ठिकाणी आठवडाभर चांगला पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी या परतीच्या पावसाने मोठा दणका दिला आहे. तसेच शेतकरी वर्गालाही या पावसाचा मोठा फटका बसला आहे. दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये पुढील तीन ते चार तास मुसळधार पावासाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुणे शहरात मध्यरात्री पासूनच मुसळधार पाऊस सुरू असून; खडकवासला धरण साखळीतून 19 हजार क्युसेक ने पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. सकाळ पासूनच पुणे शहरात मुसळधार पाऊस सुरू आहे. एकीकडे सुरू असलेल्या मुसळधार पावसाने शहरातील रस्ते हे जलमय झाले आहेत. तर दुसरीकडे पुणे शहरातील पुलगेट (Pulgate) येथे पाण्याची पाईपलाईन फुटून (burst water pipeline) लाखो लिटर पाणी वाया (water was wasted) गेले आहे. सकाळी साडेसात वाजता पुलगेट येथे पाण्याची पाईपलाईन फुटून लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. Pulgate pipeline burst
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST