Water Issue Nashik: नाशिकमधील पेठ गावात पाण्याचे दुर्भिक्ष; पाण्यासाठी महिलांची जीवघेणी कसरत - पाणीटंचाईचा सामना
🎬 Watch Now: Feature Video
नाशिक : उन्हाळा सुरू होताच महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागांत पाण्याचे संकट ओढवते. आता कडाक्याच्या उन्हाळ्यात, नाशिकमधील पेठ गावात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे. नाशिकमधील अनेक गावांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. नाशिकच्या पेठ गावात महिला पाणी आणण्यासाठी खडतर प्रवास करतात. गावातील लोकांना खोल विहिरीतील गढूळ पाणी आणावे लागत आहे, जिथे पाण्याची पातळी खूप खोल गेली आहे. तेथील महिलांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पिण्याचे पाणी आणण्यासाठी महिला जीव पणाला लावत आहे. पाणी आणण्यासाठी त्या विहिरीच्या अगदी कडेला उभे राहून पाणी ओढत आहे. त्या विहीरीला संरक्षण भिंत देखील नाही. कोणत्याही क्षणी पाय घसरला तर दुर्घटना होवू शकते. अगदी जीवाशी खेळत या महिलांचे पाणी भरणे सुरू आहे. परंतु, याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय देखील नाही.