Virat Kohli Birthday : विराटची क्रिकेटच्या देवाशी बरोबरी; सँड आर्टिस्टकडून कोहलीला खास शुभेच्छा - Virat Kohli Birthday
🎬 Watch Now: Feature Video
Published : Nov 5, 2023, 6:39 PM IST
पुरी (ओडिशा) Virat Kohli Birthday : टीम इंडियाचा सुपरस्टार विराट कोहली आज 35 वा वाढदिवस साजरा करत आहे. कोहलीच्या वाढदिवसानिमित्त त्याच्यावर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होतोय. विराटला त्याच्या वाढदिवसानिमित्त चाहते खास शुभेच्छा देत आहेत. सँड आर्टिस्ट सुदर्शन पटनायक यांनीही विराटला खास शैलीत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सुदर्शन पटनायक यांच्याकडून खास कलाकृतीद्वारे वाढदिवसाच्या विशेष शुभेच्छा विराटला देण्यात आल्या आहेत. वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी समुद्रकिनाऱ्यावर विराट कोहलीची एक अप्रतिम कलाकृती तयार केली आहे. पटनायक यांनी वाळूपासून विराटचं 7 फूट उंच शिल्प तयार केलंय. त्याच्या 35 व्या वाढदिवसानिमित्त वाळूच्या 35 बॅट बनवल्या आहेत. कोहली सध्याच्या विश्वचषकात जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. शतकांच्या संख्येच्या बाबतीत विराटनं वाढदिवशी सचिन तेंडुलकरची बरोबरी केली आहे. कोहलीनं वनडेतील 49 वे शतक पूर्ण केलंय.