Deer dance Viral Video: हरिण झाले भजनात तल्लीन, व्हायरल व्हिडिओमागे सत्य काय आहे? - हरिण व्हायरल व्हिडिओ
🎬 Watch Now: Feature Video
अहमदनगर- भजन म्हणणाऱ्या बालगोपाळांसोबत हरिण मनसोक्त नाचत असल्याचा व्हीडिओ सध्या सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही रामकृष्ण हरी म्हणत हा व्हिडिओ ट्विट केला आहे. तो व्हिडीओ नेमका कुठला आहे? त्या हरिणाला भक्तीचा लळा कसा लागला, याची माहिती ईटीव्ही भारतने जाणून घेतली आहे. किर्तनकार ह.भ. प. शितलताई देशमुख यांचा अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील बालमटाकळीमध्ये कन्हैय्या आश्रम आहे. या आश्रात गेल्या काही दिवसापूर्वी एक जखमी अवस्थेतील हरीण आले होते. त्या हरणावर शितल ताईंनी वेळीच उपचार केले. उपचारानंतर हरीण आश्रमाच्या परिसरातील जंगलातच बागडते. आश्रमात भजन किर्तन सुरू झाल्यानंतर हरिण त्या ठिकाणी येईन बागडते. हरिण आश्रमाच्या परिसरात एवढे समरस झाले आहे की हरिणाला येथील लोकांची भीतीदेखील वाटत नाही. वारकरी शिक्षण देणाऱ्या या आश्रमातील विद्यार्थी रोज हरीपाठावर पाऊली सादर करतात. एकेदिवशी हे विद्यार्थी पाऊलीत तल्लीन झालेले असताना हरीण चक्क ताई व बालगोपाळांसोबत निर्भयपणे नाचत बागडत असल्याचे दिसून आले. त्यानंतर विद्यार्थी व हरिणाचा हा रोजचा दिनक्रम झाला आहे. विशेष म्हणजे आश्रमात मुंगुसही बिनधास्त वावरत असल्याच दिसून येते. या हरिणाबाबत आश्रमाचे रामेश्वर देशमुख महाराज यांनीदेखील माहिती दिली आहे.