Viral Video : तब्बल २५ फुटांचा केक कापून केला वाढदिवस साजरा; पाहा व्हिडिओ... - सोशल मीडिया
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/13-10-2023/640-480-19754846-thumbnail-16x9-viral-video.jpg)
![ETV Bharat Marathi Team](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/authors/maharastra-1716536262.jpeg)
Published : Oct 13, 2023, 1:36 PM IST
कांदिवली Viral Video : प्रत्येकाला वाटत असतं की आपला वाढदिवस दरवर्षी वेगळ्या पध्दतीनं साजरा व्हावा. काही जण त्या दिवशी वृक्षारोपण करतात तर काही दानधर्म करतात, आणि काही जण तर एकदम राजेशाही थाटात हा दिवस साजरा करतात. असाच एक केक कटिंगचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुंबईतील कांदिवली येथील सूर्या रतूडी नावाच्या तरुणाचा ३५ वा वाढदिवस होता. या निमित्तानं त्याने मोकळ्या मैदानात तलवारीनं १५ फूट उंच आणि २५ फूट लांबीचा केक कापून अनोखा वाढदिवस साजरा केला.तसंच ज्या तलवारीने केक कापण्यात आलाय ती तलवार लाकडी असल्याचं सूर्या रतूडीनं सांगितलंय. मागील वर्षी सूर्या रतूडीने १००१ केक कापून नवीन विक्रम केला होता, त्यानंतर यावेळी 35 फूट केक कापून वाढदिवस साजरा केला.