Video of Monkeys Eating: हनुमान जयंतीला वानरांची जेवणासाठी पंगत, पाहा खास व्हिहिडो - हनुमान जयंतीला वानरांची जेवणासाठी पंगत व्हिडिओ
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/640-480-18202078-thumbnail-16x9-vanarapangat.jpg)
अकोला : हनुमान जन्मोत्सवानिमित्त अकोला जिल्ह्यातील कोथळी येथे वानरांनी हजरे लावली. फक्त हजेरी लावली नाही तर त्यांनी जेवणासाठी एका रेषेत पंगत धरत जेवणावरही ताव मारला आहे. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून तो चांगलाच व्हायरल होते आहे. ही प्रजाती उडी मारणारी आहे. मात्र, ती एका रेषेत बसून जेवण करत असल्याचे आश्यर्च व्यक्त केले जात आहे. ही सर्व वानर शाहाण्या माणसांसारखे शांत बसून जेवण करत आहेत. तसेच, काही लागले तर तसे इशारेही करत आहेत. त्यांना वाढणारे माणसही त्यांच्या समोरून जात असतील तर त्यांनीही ते काही लागले तर ते इशारे करत आहेत. या सर्व प्रकाराचे सर्वत्र कौतूक होत आहे. तोच व्हिडियो सध्या सर्वत्र दिसत आहे.
TAGGED:
Video of Monkeys Eating