Dindi Competition विठ्ठलनामाच्या गजराने शहर दुमदुमले, सांगलीत रंगला दिंडी स्पर्धा सोहळा - दिंडी सोहळा स्पर्धा सांगली
🎬 Watch Now: Feature Video
सांगली शहरात दिंडी सोहळा स्पर्धेचे आयोजन Dindi competition ceremony in Sangli करण्यात आले होते. यावेळी संपूर्ण शहर विठ्ठल नामाच्या जयघोषाने दुमदुमून गेले होते. दिंडी स्पर्धा सोहळ्याच निमित्ताने एकामागून एक वारकरी दिंडी शहरातल्या मार्गावरून प्रस्थान करत होत्या. यामुळे अवघी सांगली नगरी विठ्ठलमाय झाली होती. वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र संस्थेच्या अकराव्या वर्धापन दिनानिमित्ताने संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल काकाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली सांगली शहरांमध्ये भविष्यात दिंडी स्पर्धा सोहळ्याचा आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सांगली, कोल्हापूर, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातून सुमारे 25 दिंड्या सहभागी झाल्या होत्या. पारंपरिक वेशभूषा,टाळ-मृदुंग आणि विठ्ठल नामाच्या जयघोषात एकामागून एक अशा या दिंड्या निघाल्या होत्या. वघी सांगली नगरी विठ्ठल नामाच्या जयघोषाने दुमदुमन गेली होती. शहरातील स्टेशन चौक येथून या दिंडी स्पर्धा सोहळ्याला सुरुवात झाली. शहरातल्या प्रमुख मार्गावरून सांगली हायस्कूल या ठिकाणी या दिंडी स्पर्धा सोहळ्याचे समारोप झाला. बालगोपाळांपासून अबाल वृद्धांपर्यंत सगळ्यांनी या दिंडी स्पर्धा सोहळ्यामध्ये सहभाग घेतला होता.
Last Updated : Feb 3, 2023, 8:32 PM IST