Nitin Gadkari Drive Electric Bike : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची गाडी सुसाट - Test Drive
🎬 Watch Now: Feature Video
नागपूर - इलेक्ट्रिक वाहनांसाठी कायम आग्रही असणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही इलेक्ट्रिक वाहन चालवण्याचा मोह आवरता आला नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ( Union Minister Nitin Gadkari ) यांनी आपल्या नागपूरच्या घराच्या पार्किंगमध्ये इलेक्ट्रिक दुचाकी ( Electric Bike ) चालविण्याचा आनंद ( Nitin Gadkari Drive Electric Bike ) घेतला. एका कंपनीने तयार केलेली दुचाकी दाखविण्यासाठी नितीन गडकरी यांच्या घरी आणली होती. मग काय गडकरी यांनीही टेस्ट ड्राईव्ह ( Test Drive ) घेत गाडीची गुणवत्ता तपासून पाहिली. याबाबतचा एक व्हिडिओ समोर आला आहे. नितीन गडकरी यांचे वाहन प्रेम सर्व नागपूरकरांना माहीत आहे. संधी मिळाली नितीन गडकरी त्यांच्या दुचाकीवरून फेरफटका मारायचे. मात्र, आता व्यवस्थतेमुळे संधी मिळत नसल्याने त्यांनी पार्किंगमध्ये दुचाकी चालवत आपली थोडीशी हौस भागवली. यावेळी त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते.
Last Updated : Feb 3, 2023, 8:23 PM IST