Shivsena Agnation Against Kirit Somaiya: किरीट सोमैयांच्या फाशीसाठी 50 हजारांचे बक्षीस; उद्धव ठाकरे गटाचे सोमैयांविरुद्ध आंदोलन - Uddhav Thackeray group protests in Beed
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/18-07-2023/640-480-19030135-thumbnail-16x9-shivsena.jpg)
बीड : महाराष्ट्रभर भाजप नेते किरीट सोमैया यांचे अश्लील व्हिडिओ हे व्हायरल होत आहेत. यामुळेच सोमैया यांच्या ह्या कृत्यावर कारवाई करण्यात यावी, यासाठी बीडमध्ये उद्धव ठाकरे गटातील शिवसैनिकांनी साडे चौकात घोषणाबाजी करत हे आंदोलन केले आहे. यावेळेस भाजप आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधातही मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली आहे. शिवसैनिकांनी किरीट सोमैया यांचे प्रतिकात्मक फोटो जाळून या ठिकाणी निषेध नोंदविला. किरीट सोमैया यांना भर चौकामध्ये फाशी द्या, अशी मागणी करण्यात आली. यासाठी शासनाला आम्ही 50 हजार रुपयांचे बक्षीस देऊ. त्याचबरोबर असे कृत्य करणाऱ्या सोमैयांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी अशी मागणी शिवसैनिकांकडून करण्यात आली. किरीट सोमैया यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर याचे पडसाद आज विधान परिषदेतसुद्धा उमटले.