Snake Video कल्याणमध्ये आढळले 2 कोब्रा जातीचे साप, पाहा व्हिडिओ - दोन कोब्रा नाग आढळून आले
🎬 Watch Now: Feature Video
ठाणे थंडीच्या दिवसात विषारी सापाचा शिरकाव भक्ष्याच्या शोधात मानवी वस्तीत वाढला असून आज पुन्हा दोन कोब्रा नाग आढळून आले. विशेष म्हणजे एक कोब्रा नाग म्हशीच्या गोठ्यात तर दुसरा रिंग रोडवर फणा काढून बसल्याचे पाहताच परिसरातील नागरिकांना थंडीतही घाम फुटून घाबरटीचे वातावरण दोन्ही ठिकाणी पाहवयास मिळाले आहे. म्हशीच्या गोठ्यात शिरलेल्या नागाने सुदैवाने म्हशींना दंश केला नाही. तर दुसऱ्या नागाच्या घटनेत कल्याण - टिटवाळा मार्गाच्या रिंगरोडवर फणा काढून बसला होता. या दोन्ही नागांना सर्पमित्र दत्ता बोंबे यांनी पकडले. दरम्यान, दोन्ही कोब्रा नागाला कल्याण वनपाल अधिकाऱ्याची परवानगी घेऊन जंगलात सोडण्यात आल्याची माहितीही सर्पमित्र दत्ता यांनी दिली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:32 PM IST