MLA Bachu Kadu Image आमदार बच्चू कडूंच्या प्रतिमेला तृतीयपंथीयांनी मारले जोडे, जाणून घ्या सत्य
🎬 Watch Now: Feature Video
धुळे आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्या राजकीय वादात आमदार बच्चू कडू यांनी तृतीय पंथियांसंदर्भात आक्षेपार्ह विधान Offensive statement regarding transgender केल्याच्या निषेधार्थ धुळ्यात तृतीयपंथीयांनी आमदार बच्चू कडू यांच्या प्रतिमेला जोडे मारत transgender beat MLA Bachu Kadu image in Dhule निषेध व्यक्त केला. आमदार बच्चू कडू यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनाद्वारे तृतीयपंथीयांनी केलीय. वंचित बहुजन आघाडीच्या मार्फत तृतीय पंथीयांनी धुळे जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनात नमूद केलंय की, आमदार बच्चू कडू यांनी राजकीय वादातून रवी राणा यांच्या बद्दल टीका करतांना तृतीयपंथीय समुदायाच्या भावनांना दुखावल्या आहेत. त्यांनी त्यांच्या राजकीय वादात आक्षेपार्ह विधान करत तृतीय पंथीय समुदायाच्या भावना दुखावल्या आहेत. तसेच या समुदायाचे सामाजिक पातळीवरील प्रतिमेचं हनन केलंय. त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे तृतीय पंथीयांच्या भावना दुखावल्या असल्याने आमदार बच्चू कडूंविरोधात तृतीय पंथीय संरक्षण विधेयक २०१९ नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी तृतीय पंथीयांनी निवेदनाद्वारे केलीय. Dhule breaking news
Last Updated : Feb 3, 2023, 8:30 PM IST