Pune Transgender Andolan: नितेश राणे यांच्या विरोधात तृतीयपंथी आक्रमक; राजकीय नेत्यांनी नोंदवली प्रतिक्रिया - Nitesh Rane
🎬 Watch Now: Feature Video
पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणात आरोप प्रत्यारोपांचा खेळ सुरू आहे. राजकीय नेत्यांकडून टीकाटिप्पणी बरोबरच वादग्रस्त वक्तव्येही केली जात आहेत. काही जणांकडून तर जीभ घसरण्याइतपत वाईट वक्तव्ये केली जात आहेत. अशातच भाजप आमदार नितेश राणेंनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. नितेश राणे यांनी शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांच्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले होते. उद्धव ठाकरे यांच्यावर राणेंनी केलेल्या टीकेनंतर पुण्यात तृतीयपंथी चांगलेच आक्रमक झाले आहेत. पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्याबाहेर तृतीयपंथीयांनी आमदार नितेश राणे यांच्या विरोधात तीव्र आंदोलन केले. यावेळी रास्ता रोको करत असताना पोलिसांकडून या तृतीयपंथीायांची धरपकड करण्यात आली. यावेळी मोठा गोंधळ झाला. यावर आता राजकीय प्रतिक्रिया समोर येत आहेत. कायदेतज्ञ असीम सरोदे यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. तसेच राजकीय नेत्यांच्याही नितेश राणे यांच्या वक्त्यावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.