K Kavita Akka Dance: 'बतकम्मा उत्सवात' आमदार के कविता अक्कांचं पारंपरिक नृत्य...पाहा व्हिडिओ - K Chandrasekhar Rao
🎬 Watch Now: Feature Video
Published : Oct 22, 2023, 10:50 PM IST
सोलापूर K Kavita Akka Dance: सोलापूर शहरातील 'बतकम्मा उत्सवा'त (Bathukamma Festival Solapur) आमदार कविता अक्का रमल्या होत्या. रविवारी रात्री सोलापूर अक्कलकोट महामार्गावर असलेल्या पुंजाळ मैदानात तेलगू भाषिक व पद्मशाली समाजाच्या वतीनं मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 'बतकम्मा उत्सवा'त के कविता अक्का मोठ्या आनंदाने पारंपरिक नृत्यात सहभागी झाल्या होत्या. तेलंगाणा येथील आमदार सोलापुरातील एका सार्वजनिक उत्सवात सर्वसामान्य नागरिक किंवा सर्वसामान्य महिलां सारख सहभागी झाल्याने महिलांनी आनंद व्यक्त केला. कविता अक्कानी पारंपरिक नृत्य करत 'बतकम्मा उत्सवा'चा आनंद लुटला.
के कविता अक्का सोबत नृत्य करण्यासाठी महिलांची मोठी गर्दी : 'बीआरएस' पक्षात नुकतेच प्रवेश केलेले नागेश वल्याळ (Nagesh Valyal) यांच्या निवासस्थानी के कविता आल्या होत्या. तेलंगाणाचे मुख्यमंत्री केसीआर (K Chandrasekhar Rao) यांच्या कन्या आमदार कविता अक्का (Kavita Akka) शहरात साजरा होणाऱ्या बतकम्मा उत्सवात (Bathukamma) सहभागी झाल्या होत्या. कविता अक्का सोबत पारंपरिक नृत्य करण्यासाठी पूर्व भागातील तेलुगु भाषिक महिलांनी मोठी गर्दी केली होती.