Tractor Rally Buldhana: बुलढाण्यात ट्रॅक्टर रॅली काढून... शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न, पाहा व्हिडिओ - Dasa Patil reaction
🎬 Watch Now: Feature Video
Published : Sep 5, 2023, 8:14 PM IST
बुलढाणा Tractor Rally Buldhana: शेतकरी संघटनेचे प्रणेते स्वर्गीय शरद जोशी यांच्या जयंतीनिमित्त आज बुलढाणा जिल्ह्यातील चिखली शहरात ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला होता. दासा पाटील यांच्या नेतृत्वात शेतकरी संघटनेकडून ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली. कांद्यावरील निर्यात शुल्क कमी करा, बुलढाणा जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा, यासह विविध मागण्या यावेळी करण्यात आल्यात. सरकार सातत्यानं शेतकऱ्यांना त्रास होईल, असे निर्णय घेतंय. शेतकऱ्यांसाठी सरकारनं कांद्यावर लादलेलं निर्यात शुल्क रद्द करावं. बुलढाणा जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, यासह विविध मागण्या लावून धरत हे आंदोलन करण्यात आलंय. सरकारनं या मागण्यांची तात्काळ दखल न घेतल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दासा पाटील यांनी (Dasa Patil reaction) दिलाय. आता याकडे सरकार कसं बघतं, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.