Snowfall in Kedarnath Shimla And Manali : केदारनाथसह शिमला, मनालीत बर्फाने पसरली चादर; पाहा व्हिडिओ - राज्यात हवामान खराब

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jan 20, 2023, 7:17 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:39 PM IST

शिमला - हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये जोरदार बर्फवृष्टी झाली. त्यामुळे नागरिक बर्फवृष्टीचा चांगलाच आनंद घेत आहेत. सध्या या दोन्ही राज्यातील डोंगरी परिसर आणि पर्वत बर्फाने आच्छादले आहेत. गेल्या आठवडाभरापासून राज्यात हवामान खराब आहे. त्यामुळे उंचावरील भागात सातत्याने बर्फवृष्टी होत आहे. शिमल्यापासून कुल्लू, लाहौल स्पिती, चंबा आणि किन्नौरपर्यंत पर्वतांवर बर्फाची पांढरी चादर पसरली आहे. तर उत्तराखंडमधील जोशीमठ, केदारनाथ, आदी प्रदेशातील डोंगरी भागातही जोरदार बर्फवृष्टी होत आहे. त्यामुळे या दोन्ही राज्यातील पर्यटनक्षेत्र पर्यटकांनी गजबजले आहेत.

पर्यटकांमुळे व्यापार फुलला : हिमाचल प्रदेशातील अनेक डोंगरी भागात सातत्याने बर्फवृष्टी होत आहे. त्यामुळे या परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. पर्यटक शिमला, मनाली, कुल्लू, लाहौल स्पितीसह उत्तराखंडमधील अनेक ठिकाणी गर्दी करत आहेत. पर्यटनामुळे या दोन्ही राज्यातील व्यापार चांगलाच बहरला आहे. हॉटेलचे अगोदरच बुकींग करण्यात आले आहे. यावर्षी बर्फवृष्टी उशीरा सुरू झाली आहे. त्यामुळे  पर्यटक आले नसल्याने व्यापार मंदावला होता. मात्र त्यानंतर बर्फवृष्टी वाढल्याने पर्यटकांची संख्या वाढली. त्यामुळे या परिसरातील व्यापार चांगलाच बहरला आहे.  

शेतकरी आणि बागायतदारांचे अच्छे दिन : हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये झालेल्या बर्फवृष्टीमुळे राज्यातील पर्यटन व्यवसाय चांगलाच बहरला आहे. त्यामुळे या व्यवसायावर आधारित असलेले व्यावसायिक चांगलेच सुखावले आहेत. दुसरीकडे शेतकरी आणि बागायतदारांचे चेहरेही फुलले आहेत. बर्फवृष्टीमुळे सफरचंद रोपांचे थंडीचे तास पूर्ण होणार आहेत. त्यामुळे सफरचंद बागादेखील रोगमुक्त होणार असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. थंडीमुळे सफरचंदांची फुले आणि गुणवत्ता सुधारते. त्यामुळे डिसेंबर महिन्यासह जानेवारीच्या सुरुवातीला पाऊस व बर्फवृष्टी न झाल्याने बागायतदारांच्या अडचणी वाढल्या. मात्र आता बर्फवृष्टीनंतर बागायतदारांनी सुटकेचा नि:श्वास सोडल्याचे येथील नागरिकांनी सांगितले.  

आगामी काळात जोरदार बर्फवृष्टीचा अंदाज : आगामी काही काळात राज्यात पाऊस आणि बर्फवृष्टीचा अंदाज हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे डोंगरी भागात बर्फवृष्टी आणि सखल भागात पावसाचा इशाराही हवामान खात्याने जारी केला. हवामान खात्याचे संचालक सुरेंद्र पॉल यांनी पुढील एक आठवडा राज्यात हवामान खराब राहणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. मागील 24 तासात शिमल्यासह राज्याच्या काही भागात बर्फवृष्टी झाली. आजही शिमल्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये बर्फवृष्टी सुरूच राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय होत असल्यामुळे बहुतांश भागात पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे.

प्रशासनाने जारी केली अॅडव्हायझरी : हिमाचल आणि उत्तराखंड या दोन्ही राज्यात सध्या जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे. त्यामुळे या राज्यातील काही जिल्ह्यात प्रशासनाने अॅडव्हायझरी जारी केली आहे. त्यात कुल्लू, शिमला, किन्नौर, लाहौल स्पीतींचा समावेश आहे. पर्यटक आणि स्थानिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले. बर्फवृष्‍टीच्‍या काळात वाहन चालवू नये,  घराबाहेर पडू नये, असे आवाहन जिल्‍हा प्रशासनाने केले आहे.

हेही वाचा - Bageshwar Sarkar Divya Darbar: बागेश्वर धामच्या दिव्य दरबारात नेमकं काय झालं? बाबांनी दाखवला चमत्कार अन् महिला म्हणाली..

Last Updated : Feb 3, 2023, 8:39 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.