Air show in nagpur : उद्या नागपुरात भारतीय हवाई दलाचा 'एअर शो' - Amrit Jubilee of Indian Independence
🎬 Watch Now: Feature Video
नागपूर भारतीय हवाई दलातर्फे Indian Air Force भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्ताने नागपूर येथील वायुसेना नगर येथे उद्या 'एअर शो'चे आयोजन करण्यात आले आहे. एअर शो Air show आधी गेल्या दोन दिवसांपासून वायूसेनेच्या वैमानिकांकडून नागपूरच्या आकाशात सराव केला जातो आहे. वायुसेना नगरातील मेंटनन्स कमांड मुख्यालय परिसरात एअर शो होत आहे. यामध्ये सूर्य किरण एरोबॅटिक टीम, सारंग हेलिकॉप्टर एअर डिस्प्ले टीम,आकाशगंगा टीम आणि एअर वॉरियर ड्रिल टीम यांचा समावेश आहे. इतर उपक्रमांमध्ये पॅरा हँग ग्लायडिंग,वाहतूक आणि लढाऊ विमानांद्वारे फ्लायपास्ट,आयएएफ उपकरणांचे स्थिर प्रदर्शन, एरो-मॉडेलिंग आणि एअर फोर्स बँडची कामगिरी यांचा समावेश असून सर्व युनिट कडून कसून सराव करण्यात आला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST