तृणमूलच्या खासदारानं संसदेबाहेर केली उपराष्ट्रपतींची नक्कल, Watch Video - राहुल गांधी

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 19, 2023, 5:45 PM IST

नवी दिल्ली : संसदेच्या दोन्ही सभागृहातील १०० हून अधिक विरोधी सदस्यांच्या निलंबनाच्या निषेधार्थ विरोधी पक्षाच्या खासदारांनी मंगळवारी संसदेच्या संकुलात निदर्शनं केली. यावेळी खासदारांनी 'मॉक प्रोसीडिंग' आयोजित केली होती. निलंबित खासदारांनी संसदेच्या नवीन इमारतीच्या गेटवर धरणं धरलं. या दरम्यान तृणमूल काँग्रेसचे लोकसभा सदस्य कल्याण बॅनर्जी यांनी राज्यसभा अध्यक्ष आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या बोलण्याच्या शैलीची नक्कल केली. यावेळी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधीही तेथे उपस्थित होते. त्यांनी त्यांच्या मोबाईलवर बॅनर्जी यांचा नक्कल करतानाचा व्हिडिओ बनवला. कल्याण बॅनर्जी यांचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर सर्वत्र पाहिला जातोय. तत्पूर्वी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी संसदेच्या संकुलातील महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर निदर्शनं केली. यामध्ये काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी अध्यक्ष राहुल गांधी तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सहभागी झाले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.