Tigress Noori viral Video: वाघिणी नुरीची आपल्या मुलीशी भांडण, ट्रेनिंग देतानाचा व्हिडिओ व्हायरल - Ranthambore National Park

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : May 9, 2023, 10:27 PM IST

Updated : May 10, 2023, 11:53 AM IST

राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील जगप्रसिद्ध रणथंबोर नॅशनल पार्कमधून एक विलोभनीय दृश्य समोर आले आहे, ज्यात T105 वाघीण नूरी तिच्या मादी शावकांना म्हणजेच तिच्या पिल्लांना  प्रशिक्षण देताना भांडणात पडली आहे. रणथंबोर पार्क सहलीला गेलेल्या पर्यटकांनी हे विलोभनीय दृश्य आपल्या कॅमेऱ्यात कैद केले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रणथंबोर येथील T105 नूरी या वाघिणीने सुमारे दोन वर्षांपूर्वी तीन पिल्लांना जन्म दिला होता. ती रणथंबोरच्या झोन क्रमांक २ मध्ये तिच्या तीन पिल्लांसह फिरत होती. यादरम्यान नूरी आपल्या मादी शावकांना वन्यजीव प्रशिक्षण देत होती. प्रशिक्षण देत असताना नूरी या वाघिणीची मादी शावक यांच्यात झटापट झाली. सुमारे 15 ते 20 मिनिटे दोघांमध्ये हाणामारी सुरू होती. यादरम्यान नूरी या वाघिणीचे दोन शावक वाघिणीपासून दूर बसले. नूरी या वाघिणीचे वय सात ते आठ वर्षे आहे. प्रशिक्षणादरम्यान नूरीची मादी चिडली आणि दोघांमध्ये भांडण झाले.

Last Updated : May 10, 2023, 11:53 AM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.