Snow Leopard Caught In Camera : लाहौल स्पितीच्या रोडवर धावताना आढळले तीन हिमालयीन बिबटे, पाहा व्हिडिओ

By

Published : Jan 27, 2023, 10:31 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:39 PM IST

thumbnail

कुल्लू - रात्रीच्या गर्द काळोखात बर्फाने आच्छादलेल्या रोडवर धावताना तीन हिमालयीन बिबटे आढळल्याने पर्यटकांच्या अंगावर काटा आला. तीन हिमालयीन बिबटे धावतानाचा व्हिडिओ लाहौल स्पितीमध्ये सोनम जंगपोने आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. बराच वेळ हे बिबटे रोडवर धावत असल्याने मनाली लेह महामार्गावर पर्यटकांनीही त्यांचा आनंद लुटला. लाहौल स्पितीमध्ये सध्या बर्फाची पांढरी चादर सगळीकडे पसरली आहे.

अचानक कार समोर आले हिमालयीन बिबटे : सोनम जंगपो हा रात्री टॅक्सीने मनालीहून केलांगला येत होता. अचानक त्याच्या कारसमोर 3 हिमालयीन बिबटे आले. त्यांने त्यांचा व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. गाडीचा लाईट येताच तिन्ही हिमालयीन बिबटे रस्त्यावर धावू लागले. काही वेळाने बर्फाने आच्छादलेल्या परिसरात गेल्याने अंधारात दिसेनासे झाले. मुलिंग ब्रिज ते चुरपूक पेट्रोल पंपादरम्यान हिमालयीन बिबटे अनेकदा दिसत असल्याचे सोनमने यावेळी सांगितले.

पर्यटकांनी रात्री काळजी घेणे आवश्यक : रात्री येथे येणाऱ्या पर्यटकांनी काळजी घेणे आवश्यक असल्याची माहिती सोनमने दिली. याआधीही मुलिंग पूल आणि चुरपूक पेट्रोल पंपाजवळ हिमालयीन बिबटे दिसले आहेत. लाहौल खोऱ्यातील वातावरण हिम बिबट्यासाठी सर्वोत्तम आश्रयस्थान असल्याचे सिद्ध होत आहे. याआधीही लाहौल स्पिती खोऱ्यात स्थानिक नागरिकांनी हिमालयीन बिबट्याचे पिल्लू आणि बिबट्याला कॅमेऱ्यात कैद केले आहे. ज्या पर्यटकांना वन्यजीव छायाचित्रणाची आवड आहे, त्यांच्यासाठी ही एक पर्वणी असल्याचेही सोनमने यावेळी सांगितेल. त्यामुळे येथील वन्यजीव पर्यटनाला चालना मिळणार असल्याचेच बोलले जाते.

हिमाचल हिमालयीन बिबट्याचे घर : हिमालयीन बिबटे हा हिमाचलचा राज्य प्राणी आहे. या प्रदेशात आडळणारा हिमालयीन बिबट्या हा बर्फाच्या शिखरांवर राहतो. हिमालयीन बिबट्या क्वचितच दिसत असला तरी आजकाल हिमाचलमध्ये बर्फवृष्टी होत आहे. चंबा ते लाहौल स्पितीपर्यंत सर्वत्र बर्फ पसरला आहे. त्यामुळे हिमालयीन बिबट्या दिसत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. चंबा, लाहौल किंवा किन्नौर सारखे बर्फाच्छादित पर्वत हे हिमालयीन बिबट्यांचे नैसर्गिक अधिवास आहे. हिमाचलमध्ये सुमारे 23 हजार स्क्वेअर किमी परिसरात हिमीलयीन बिबट्या फिरत असल्याचे आढळून आले आहे. यामध्ये धौलाधर, कुल्लू, चंबा, किन्नौर आणि लाहौल स्पिती हा परिसर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

हिमालयीन बिबट्यांचे संवर्धन : कॅमेरा ट्रॅपद्वारे हिमालयीन बिबट्यांची गणना केली जाते. हिमालयीन बिबट्यांचे संवर्धन करणारे हिमाचल हे देशातील पहिले राज्य आहे. सध्या हिमाचलमध्ये 73 हिमालयीन बिबटे आढळून आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यापैकी बहुतेक हिमालयीन बिबटे हे लाहौल स्पितीमध्ये आहेत. त्यामुळे पर्यटकांनी फिरताना काळजी घेण्याचे आवाहन ईटीव्ही भारतकडून करण्यात येत आहे. 

हेही वाचा - Threat To Ashish Shelar : आशिष शेलार यांना जीवे मारुन समुद्रात फेकण्याची धमकी, कार्यालयात आले निनावी पत्र

Last Updated : Feb 3, 2023, 8:39 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.