Drunken Girls Drama On Road : दारु पिऊन तरुणींचा भररस्त्यात धुडगूस; पोलिसाचा मोबाईल फोडला, शिवीगाळही केली, पहा व्हिडिओ - saharanpur
🎬 Watch Now: Feature Video
सहारनपूर - पश्चिम उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यात तरुणींनी दारू पिऊन गोंधळ घातल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. दारूच्या नशेत असलेल्या या तीन मुलींनी रस्त्याच्या मधोमध चांगलाच गोंधळ घातला. एका पोलीस कर्मचाऱ्याने त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी त्याचा मोबाईल हिसकावून फोडला. मुलींनी पोलीस कर्मचारी आणि आजुबाजूच्या व्यक्तींना शिवीगाळही केली. त्यानंतर पोलिसांनी तिघींनाही ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. वैद्यकीय तपासणीत मुलींनी दारू प्यायल्याचे स्पष्ट झाले आहे. यानंतर पोलिसांनी मुलींच्या नातेवाइकांना बोलावून त्यांना त्यांच्या ताब्यात दिले. या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. त्यानंतर कारवाई केली जाईल. प्रकरणाशी संबंधित एक व्हिडिओही समोर आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. पहा हा व्हिडिओ..