Three Burnt Alive In Accident : दोन ट्रेलरच्या भीषण अपघातात तीन जणांचा जळून मृत्यू, एकजण गंभीर - ट्रेलर अपघात
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/640-480-18330416-thumbnail-16x9-aag.jpg)
बाडमेर : राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यात दोन ट्रेलर एकमेकांवर आदळून सोमवारी सकाळी भीषण अपघात झाला. ही घटना गुडामलानी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. या अपघातानंतर दोन्ही ट्रेलरने पेट घेतल्याने तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर जीव वाचवण्यासाठी उडी मारलेल्या एकाची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बिकानेरहून माती भरुन सांचोरकडे एक ट्रेलर जात होता. तर दुसरा ट्रेलर टाइल्सने भरलेला होता. गुडामलानी अलपुराजवळ अलसुबा येथे या दोन्ही ट्रेलरमध्ये जोरदार टक्कर झाली. त्यामुळे अपघातानंतर या दोन्ही ट्रेलरला आग लागली. दोन्ही ट्रेलरमध्ये चालकासह चार जण असल्याची माहिती आहे. यामध्ये तीन जणांचा जळून मृत्यू झाला, तर एका तरुणाने उडी मारून जीव वाचवला. मात्र तोही गंभीर जखमी झाला आहे. अपघातानंतर महामार्गावर प्रचंड वाहतूक खोळंबली आहे. दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक शुभकरन खिची यांनी दिली आहे. या अपघातात 3 जण जळाले असून आग आटोक्यात आणण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. त्यासह या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
हेही वाचा - Murder : पैशाच्या देवाण-घेवाणवरून वाद, ५५ वर्षीय महिलेचा खून