Ganeshotsav 2023 : यंदाच्या गणेशोत्सवात घरगुती गणेशमूर्ती शाडू मातीच्या? Watch Video - The work of making Ganesha idols of Shadu
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई : १९ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवासाठी मूर्तिकार व्यस्त आहेत. यंदा मुंबई महापालिकेने कठोर पावले उचलत सर्व घरगुती गणेशमूर्ती शाडू मातीच्या आणि पर्यावरणपूरक असाव्यात, असे आवाहन केले आहे. मुंबईतील गणेशमूर्ती कारखान्यात शाडूच्या गणेशमूर्ती बनवण्याचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू झाले आहे. गेल्या वर्षी मुंबई महापालिकेने घरगुती प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) गणेशमूर्ती बसविण्यास परवानगी दिली होती. मात्र यंदा कठोर पावले उचलत घरगुती गणेशमूर्तीची उंची कमाल चार फूट करण्यात येणार आहे. तसेच केवळ शाडू मातीच्या मूर्तीच पर्यावरणपूरक असाव्यात, असे परिपत्रक काढण्यात आले आहे. शाडू मातीच्या मूर्ती बनविणारे मूर्तिकार आनंदी असताना, गणेशभक्तांना पीओपी मूर्तींपेक्षा शाडू मातीच्या मूर्तींची किंमत जास्त असल्याने त्याचा अतिरिक्त खर्च सहन करावा लागत आहे.